बोस्टन : तुम्ही नियमितपणे कॉफी घेत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. नुकत्याच करण्यात आलेल्या संशोधनातून दररोज कॉफी घेणाऱ्या व्यक्तींच्या आयुष्यमानात वाढ होत असल्याचे स्पष्ट झालेय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमेरिकेतल्या बोस्टन युनिर्व्हसिटीतील संशोधनाकांनी हे संशोधन केलेय. या संशोधनादरम्यान कॉफीसारखे पेय नियमित घेतल्यास आयुष्यमान वाढत असल्याचे समोर आलेय. 


कॉफीमुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहते. जगभरात हृदयरोगामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण वाढत चाललेय. ज्या व्यक्ती नियमितपण कॉफीचे सेवन करतात त्यांच्या तुलनेत कॉफी न पिणाऱ्या व्यक्तींचा हृदयसंबंधित आजारामुळे मृत्यू होण्याचा धोका २० टक्के अधिक असतो. 


व्यक्तींचे वय वाढले की हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधीचे आजार सुरु होतात. यामुळे आयुष्यमान कमी होते. मृत्यूचा धोका वाढतो. कॉफीमधील कॅफेनमुळे हृदय व रक्तवाहिन्यांवर अतिरिक्त दाब निर्माण होत नाही त्यामुळे संबंधित आजारांचा धोका कमी होतो.