हे पदार्थ वाढवतात कॅन्सरचा धोका
हल्ली लोकांचा जास्त एनर्जी असलेले पदार्थ, तेलकट, साखरेचे पदार्थ, जंक फूड खाण्याकडे अधिक कल असतो. मात्र अशा खाण्यांमुळे मधुमेह, हृदयरोग, हायपरटेंशन, काही विशिष्ट प्रकारचे कॅन्सर आणि मुख्यत्वेकरुन लठ्ठपणा वाढताना दिसतो.
मुंबई : हल्ली लोकांचा जास्त एनर्जी असलेले पदार्थ, तेलकट, साखरेचे पदार्थ, जंक फूड खाण्याकडे अधिक कल असतो. मात्र अशा खाण्यांमुळे मधुमेह, हृदयरोग, हायपरटेंशन, काही विशिष्ट प्रकारचे कॅन्सर आणि मुख्यत्वेकरुन लठ्ठपणा वाढताना दिसतो.
हे आहेत काही पदार्थ जे कॅन्सरचा धोका वाढवण्यास कारणीभूत ठरतात
हॉट डॉग - हॉट डॉग सारखे पदार्थ खाल्ल्यास कॅन्सरचा धोका १८ टक्क्यांनी वाढतो.
सॉसेजेस - दिवसाला एक ते दीड सॉसेजेच खाल्ल्यास कॅन्सरचा धोका १८ टक्क्यांनी वाढतो.
हॅम - हॅम म्हणजे प्रोसेस्ड मीट होय. हॅम अधिक प्रमाणात खाल्ल्यास हाय ब्लड प्रेशरचा धोका वाढतो.
बीफ जर्की - बीफ जर्की म्हणजे प्रकिया केलेला पदार्थ. यात मोठ्या प्रमाणात सोडियम नायट्रेट असते जे शरीरासाठी घातक आहे.