मुंबई : जेवणामध्ये अधिक मीठ घालण्याची सवय असेल तर लगेचच ही सवय बदला. कारण ही सवय तुमच्या शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. अधिक प्रमाणात मीठाचे सेवन अपायकारक असते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जेवणाला चव देण्याचे काम मीठ करते मात्र त्याचे प्रमाण संतुलित असावयास हवे. सोडियमची शरीराला गरज असते. मात्र त्याचे सेवन अधिक नको. 


अधिक मीठ सेवन केल्याने होणारे अपायकारक


हृद्यरोगाची भिती - अधिक मीठाच्या सेवनाने हृद्यासंबंधित आजारांचा धोका वाढतो. त्यामुळे हृद्याचे आरोग्य चांगले राखण्यासाठी योग्य प्रमाणात मीठाचे सेवन करणे गरजेचे. 


तुम्हाला डिहायड्रेशनची समस्या जाणवत असेल तर तुम्ही मीठाचे अधिक सेवन करता. जेवणात अधिक मीठाचा वापर केल्यास डिहायड्रेशनची समस्या उद्भवते.