या महिलेने १८ महिन्यांत ९० किलो वजन घटवले
जगातील अनेक भागांमध्ये लठ्ठपणाची समस्या वाढत चालली आहे. सध्याच्या व्यस्त जीवनशैलीमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण वाढत चालले आहे. ही अशाच एका लठ्ठ महिलेची कहाणी आहे जिचे वजन १५० किलो होते. शेरिल ब्लेथ असे त्या महिलेचे नाव आहे.
मुंबई : जगातील अनेक भागांमध्ये लठ्ठपणाची समस्या वाढत चालली आहे. सध्याच्या व्यस्त जीवनशैलीमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण वाढत चालले आहे. ही अशाच एका लठ्ठ महिलेची कहाणी आहे जिचे वजन १५० किलो होते. शेरिल ब्लेथ असे त्या महिलेचे नाव आहे.
मोठ्या प्रमाणात जंक फूड, व्यायाम न करण्याने तिचे वजन दीडशे किलोपर्यंत वाढले. मात्र या वाढलेल्या वजनाचा मात्र तिला चांगलाच त्रास व्हायला लागला. त्यानंतर मात्र तिने वजन कमी करण्याचे प्रयत्न सुरु केले. आणि अवघ्या १८ महिन्यांत तिने ९० किलो वजन कमी करण्याची किमया साधली.
विशेष म्हणजे यासाठी तिने खास डाएट प्लान अथवा कोणतीही सर्जरी केली नाही तर फक्त तिने तिच्या खाण्याच्या सवयी बदलल्या. सर्वात आधी तिने जंक फूड खाणे बंद केले. तसेच तिने जेवणात विशिष्ट पदार्थांचा समावेश केला आणि १८ महिन्यांत तिने ९० किलोपर्यंत वजन कमी केले.
ब्रेकफास्टमध्ये ती बेकन, टोमॅटोज, दोन अंडी आणि मशरुम्स खात असे. दुपारच्या जेवणात उकडलेले अथवा बेक केलेले बटाटे. संध्याकाळच्या स्नॅक्समध्ये फळे अथवा दहीचा समावेश. त्यानंतर रात्रीच्या जेवणात स्पॅगेटी अथवा पास्ता विथ चीज आणि टोमॅटो सॉस.