मुंबई : लवकरच निजे लवकर उठे त्यास आरोग्यसंपदा लाभे असे म्हटले जाते. मात्र आपल्यापैकी किती जण हा नियम पाळतात. याचे हो असे उत्तर फार कमी जणांचे असेल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेकांना सकाळी उठण्यास फार त्रास होतो. अनेकदा आपले रोजचे वेळापत्रक बिघडल्यास त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. 


त्यासाठी हे आहेत काही उपाय ज्यामुळे तुम्हाला सकाळी लवकर उठण्यास मदत होईल.


१. अपूर्ण झोपेचा परिणाम आपल्या शरीरावर होतो. त्यामुळे रात्री वेळेवर झोपायला जा. त्यामुळे तुमची झोप पूर्ण होत तुम्ही सकाळी जागे होऊ शकाल.


२. आठवड्याचे योग्य वेळापत्रक बनवा. सुट्टीच्या दिवसांचे वेगळे वेळापत्रक बनवा. 


३. शरीरासाठी ७ ते ८ तास झोप गरजेची असते. त्यामुळे तितकी झोप घेण्याला प्राधान्य द्या. 


४. सकाळी जाग आल्यानंतर लगेचच बेडवरुन उठा. बेडवर लोळत राहिल्यास आळस येतो. सकाळी काही व्यायाम करा. यामुळे तुम्हाला फ्रेश वाटेल.