मुंबई : मेहंदी लावणं प्रत्येक मुलीला आवडतं... सणांच्या दिवसांत मेंहदी लावूनच सण सुरू झाल्यासारखं वाटतं. मेहंदीचा रंग गडद होईपर्यंत वाट पाहण्याची मजाच वेगळी असते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण, हातावर काढलेली सुंदर मेहंदी रंगलीच नाही तर... त्याची मजाच निघून जाते... आणि त्या शुभ दिवसाचीही... तुम्ही आता घरचे काही सोपे उपाय करुनही मेहंदीला नैसर्गिक रंग आणू शकता...


घरच्या घरी मेहंदीला नैसर्गिक रंग आणण्याचे 5 सोपे उपाय:-


1. मेहंदी लावण्यापूर्वी हात स्वच्छ धुवून घ्यावेत


2. मेहंदी लावून झाल्यावर कापसाने थोडं थोडं लवंगाचं तेल लावावं


3.  मेहंदी काढल्यानंतर कमीत कमी चार तास ती आपल्या हातावर सुकू द्यावी


4. सुकलेली मेहंदी हातावरुन काढावी आणि हाताला लवंगाचा धूर द्यावा 


5. मेहंदी काढल्यावर 12 तास पाण्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा