गुडघे दुखीचा त्रास असणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी
वैज्ञानिकांनी बायोइंकच्या मदतीने गायच्या कार्टिलेजचा वापर करत एक नवी 3डी प्रिंटिंग प्रक्रिया विकसित केली आहे. ज्यामुळे ऑर्थराइट्सच्या रुग्णांच्या घासल्या गेलेल्या गुडघ्यांसाठी एक त्यासंबंधीत पॅच तयार करण्यास मदत होईल.
वॉशिंग्टन: वैज्ञानिकांनी बायोइंकच्या मदतीने गायच्या कार्टिलेजचा वापर करत एक नवी 3डी प्रिंटिंग प्रक्रिया विकसित केली आहे. ज्यामुळे ऑर्थराइट्सच्या रुग्णांच्या घासल्या गेलेल्या गुडघ्यांसाठी एक त्यासंबंधीत पॅच तयार करण्यास मदत होईल.
बायोप्रिंटींगला विकसित करण्यासाठी कार्टिलेज एक उत्तम लिक्विड आहे ज्याला आपण गुढघ्यातील तेल असं ही म्हणतो. यामध्ये कोणतीही रक्तवाहिनी नसते. हा एक कोशिकेचा प्रकार आहे. हा एकदा नष्ट झाल्यानंतर तो पुन्हा तयार होत नाही.
अमेरिकेतील पेनसिल्वेनिया राज्य विद्यापीठातील प्रोफेसर इब्राहिम म्हणतात की, "आमचे मुख्य ध्येय हे असं पॅच किंवा लिकविड तयार करणं आहे जे मोठ्या प्रमाणात घासले गेलेल्या गुडघ्यांसाठी कामात येईल.