मुंबई : नवजात शिशुंना सुरुवातीच्या दिवसात अशा कोणत्या गोष्टी दिल्या पाहिजेत जे त्यांच्या शरिराला फायदेशीर आहेत याबाबतची माहिती अनेकांना नसते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लहान मुलांना कोणत्या पौष्टिक गोष्टी खायला दिल्या पाहिजेत. याबाबत तुम्हाला सांगणार आहोत. १ वर्षाच्या खालील मुलांना काय खायला द्याल.


१. पालक : पालकमध्ये मोठ्या प्रमाणात लोह असतं. लोह मोठ्या प्रमाणात रेड ब्लड सेल्स निर्माण करतो. वाढत्या मुलांसाठी हे खूप महत्त्वाचं असतं. 


२. कडधान्य : लहान बाळाच्या आहारात शिजवलेलं कडधान्य असावेत. यामुळे पोटाचे विकार होत नाही आणि अपचन सारख्या समस्याही दूर राहतात.


३. ओट्स : लहान मुलांना ओट्स नेहमी देऊ शकता. ओट्समध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन, फायबर आणि कार्बोहाइड्रेट असतं. लहान मुलांची ताकद यामुळे वाढते.


४. सफरचंद : सफरचंद बारीक करुन तुम्ही मुलांना देऊ शकता. यामध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सीड असतं. मुलांच्या स्किनसाठी हे अधिक चांगलं असतं. मोसंबीमधून देखील विटामिन सी मोठ्या प्रमाणात मिळतं. जे रोगांपासून रक्षण करतो