मळमळ, उलटीचा त्रास होत असल्यास खावे हे ६ पदार्थ
पित्त किंवा मळमळ होणे. किंवा अनेकांना प्रवासात उलट्यांचा त्रास होतो. अशावेळी पोटाचे कार्य सुरळीत ठेवण्यासाठी योग्य आहार घेणे गरजेचे असते. मात्र डोक्याला जखम झाल्यानंतर उलटी होत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. मात्र ताण-तणाव, भीती, पचनाच्या त्रासामुळे उलटी होत असल्यास हे `6` पदार्थ खाल्ले पाहिजे.
मुंबई : पित्त किंवा मळमळ होणे. किंवा अनेकांना प्रवासात उलट्यांचा त्रास होतो. अशावेळी पोटाचे कार्य सुरळीत ठेवण्यासाठी योग्य आहार घेणे गरजेचे असते. मात्र डोक्याला जखम झाल्यानंतर उलटी होत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. मात्र ताण-तणाव, भीती, पचनाच्या त्रासामुळे उलटी होत असल्यास हे '6' पदार्थ खाल्ले पाहिजे.
१. बर्फाचा तुकडा - उलटीचा त्रास होत असल्यास थेट पाणी पिण्याऐवजी बर्फाचा तुकडा चघळणे फायदेशीर ठरते. अनेकदा परीक्षेच्या काळात भीतीमुळे मुलांमध्ये मळमळ वाढते. अशावेळी बर्फ चघळायला दिल्यास मळमळ कमी करण्यास मदत होते.
२. क्रॅकर्स - अनेकदा गरोदरपणात स्त्रियांना जाणवणारी मळमळ कमी करण्यासाठी क्रॅकर्स बिस्किटं रिकाम्या पोटी खाण्याचा सल्ला देतात. मोशन सिकनेस किंवा उलटीचा त्रास होत असल्यास बिस्किटं खा.
३. दही - पचनाचा त्रास कमी करण्यासाठी ग्लासभर दूधाप्रमाणेच योगर्ट / दही देखील फायदेशीर ठरते. मात्र ताजं आणि गोड दही खा. आंबट दह्याचा वापर टाळा.
४. ब्लॅन्ड फूड - उलटीच्या त्रासानंतर तिखट, खारट पदार्थ खाणे टाळा. खिचडी भात, सलाड, सूप यासारखे हलके पदार्थ खाणे फायदेशीर ठरते.
५. BRAT डाएट - केळी, भात, सफरचंद आणि टोस्ट म्हणजेच BRAT डाएट. उलटीच्या त्रासानंतर भूक लागल्यानंतर या पदार्थांचे सेवन करा. केवळ केळ खाऊनदेखील मळमळ कमी करण्यास मदत होते.
६. संत्र्याचा रस - उलटीचा त्रास किंवा मळमळ जाणवत असल्यास ग्लासभर संत्र्याचा रस पिणं फायदेशीर ठरते.