मुंबई : व्यायाम म्हटलं की काही जणांच्या अंगावर काटा येतो, लवकरच उठून पायपीट करणं अथवा जीममध्ये घाम गाळणं त्यांच्या प्रवृत्तीतच नसतं... अशा लोकांसाठी पोहण्याचा व्यायाम उत्तम ठरू शकतो... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोहण्यानं संपूर्ण शरीराला लवचिकता प्राप्त होते...  शरीराच्या प्रत्येक भागाला व्यायाम मिळतो. पोहण्यानं शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर पडतात. त्याचप्रमाणे उष्मांक जळण्यास मदत होते.


पोहणं हा तणाव नष्ट करण्याचा एक उत्तम उपाय आहे. पोहताना शरीरात इंडोफ्रील नावाचं रसायन निर्माण होतं. हे रसायन डिप्रेशन घालवण्यासाठी परिणामकारक आहे. पोहताना संपूर्ण शरीर हलकं होतं.


पोहणं हा व्यायाम तर आहेच त्याबरोबर मनोरंजन होते. वेगवेगळे स्ट्रोक्स शिकताना, पाण्यामध्ये खेळ खेळताना, पाण्यात चालताना एक वेगळीच मौज वाटते.