झोपेतही तुम्ही वजन कमी करु शकता...या ५ टिप्स वापरा...
झोप पूर्ण न झाल्यास त्याचा केवळ आपल्या मूडवरच परिणाम होत नाही तर वजनावरही परिणाम होतो. दिवसातून आठ तासांची झोप मनुष्याला गरजेची असते.
मुंबई : झोप पूर्ण न झाल्यास त्याचा केवळ आपल्या मूडवरच परिणाम होत नाही तर वजनावरही परिणाम होतो. दिवसातून आठ तासांची झोप मनुष्याला गरजेची असते. पुरेशी झोप न झाल्यास तणाव वाढवणारे हार्मोन्स वाढतात. यामुळे तुमच्या आरोग्यावर याचा परिणाम होतो. तसेच वजनही वाढण्याची शक्यता असते.
अफिसमधून आल्यानंतर सरळ जिमला जा अथवा घरी वर्कआऊट करा. रात्रीच्या वेळेस डंबेल्सने व्यायाम केल्याने चयापचनाच्या क्रियेचा वेग १६ तासांसाठी वाढतो.
जिम जाणाऱे नेहमी प्रोटीन शेक घेतात. केसीनवाला प्रोटीन शेक घेणे चांगले. याला पचण्यासाठी ८ तासांचा कालवधी लागतो आणि रात्रभर चयापचनाची क्रिया सुरु राहते.
जिमवरुन आल्यानंतर थंड पाण्याने आंघोळ करा. थंड पाण्याने आंघोळ केल्यास शरीरावरील ब्राऊन फॅट कमी होईल.
चहा, कॉफी घेण्याऐवजी ग्रीन टी घ्या. दिवसातून तीन वेळा ग्रीन टी घेतल्यास रात्रभरात ३.५ टक्के कॅलरीज बर्न होतात.
रात्री थंडावा असलेल्या खोलीस झोपल्याने कॅलरीज बर्न होतात. यामुळे तुमचे वजन कमी होऊ शकते.