पाटणा : बिहारमध्ये छटपुजेदरम्यान घडलेल्या दोन दुर्घटनांमध्ये 11 जणांचा मृत्यू झालाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरभंगा येथे रेल्वेच्या धडकेत सहा महिला ठार झाल्यात. छटपूजा आटोपून त्या घरी येत असताना ही दुर्घटना घडली. 


यावेळी ट्रॅक पार करत असताना दिल्लीहून येत असलेल्या स्वतंत्रता सेनानी एक्सप्रेस रेल्वेची धडक बसल्याने या पाचही महिलांचा मृत्यू झाला. तर दुसरीकडे मुझ्झफरपूर येथे पाच मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडलीये.