रायपूर : छत्तीसगडमधील बलरामपूर जिल्ह्यात मध्यरात्री एका छोट्या पुलावरुन बस कोरड्या नदीत कोसळून झालेल्या अपघातात १३ ठार तर ५३ प्रवासी जखमी झालेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही लक्झरी बस झारखंड राज्यातून गध्वा येथून रायपूरकडे येत होती. एका घाटातील वळणावर एक मोटरसायलस्वाराला वाचविण्याच्या नादात बस छोट्या पुलावरुन नदीत कोसळली. कोरड्या नदीत पडलेल्या बसने दोन ते तीनवेळा पलटी खाल्ली. त्यामुळे बस चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले, अशी माहिती पोलिसांनी दिली.


घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून मदत आणि बचावकार्य सुरु आहे. आतापर्यंत १३ लोकांचे मृतदेह हाती लागले असून १६ गंभीर जखमींना अंबिकापूर जिल्ह्यातील रुग्णालयात भर्ती करण्यात आलेय. तर अन्य ३७ जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलेय. ओळख पटलेल्यांपैकी बहुतेक पुरुष आहेत. या दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री रमन सिंग यांनी तीव्र दु:ख व्यक्त केलेय.