नोटबंदीचा निषेध करणार १३ पक्ष आणि २०० खासदार
नोटबंदी निर्णयाचा निषेध करण्यासाठी संसदेतील तेरा पक्ष आणि जवळपास दोनशे खासदार संसद भवन परिसरात एकत्र जमणार आहेत. सर्वपक्षीय निषेध आंदोलनात याआधी कधीही सामील न झालेल्या बसपा अध्यक्षा मायावतीसुद्धा सहभागी होतील.
नवी दिल्ली : नोटबंदी निर्णयाचा निषेध करण्यासाठी संसदेतील तेरा पक्ष आणि जवळपास दोनशे खासदार संसद भवन परिसरात एकत्र जमणार आहेत. सर्वपक्षीय निषेध आंदोलनात याआधी कधीही सामील न झालेल्या बसपा अध्यक्षा मायावतीसुद्धा सहभागी होतील.
महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ तासभर धरणे देत विरोधी पक्ष एकजुटीचं दर्शन घडवणार आहेत. नोटाबंदीच्या निर्णयाने सपा आणि बसपा, द्रमुक आणि अण्णा द्रमुक, तृणमूल आणि डावे अशा परस्पर विचारसरणीचे पक्ष एकत्र येणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस, आप, राजद, जेडीयू असे पक्ष आंदोलनात सहभागी होणार आहेत.
सोनिया गांधी, मायावती, मुलायम सिंह यादव हे बडे नेते या आंदोलनात सहभागी होण्याची शक्यता आहे. मात्र यावेळी ममता बॅनर्जी यांच्या मार्चमध्ये काही दिवसांपूर्वी सहभागी होणारी शिवसेना या आंदोलनात सहभागी होणार नाही.