छिंदवाडा : मध्यप्रदेशात छिंदवाडा जिल्ह्यात एका रेशन दुकानाला लागलेल्या आगीत किमान १४ जणांचा होरपळून मृत्यू झालाय. बागरी या गावात रेशन दुकानामध्ये रॉकेलचं वाटप सुरू असताना ही दुर्घटना घडलीये.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार दुकानामध्ये वाटपासाठी साठवून ठेवलेल्या रॉकेलनं पेट घेतला आणि त्यानंतर आग चारही बाजूंना पसरली. यामध्ये अनेक जण जागीच होरपळले. यामध्ये अनेक जण जखमी झाले असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येतेय. मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी मृतांच्या नातलगांना ४ लाखांची तर जखमींना ५० हजारांची मदत जाहीर केलीये.