नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रक्षा मंत्रालयाला १५ ऑगस्ट हा दिवस देखील २६ जानेवारी प्रमाणे साजरा करावा असं सांगितलं आहे. १५ ऑगस्टपासून २२ ऑगस्टपर्यंत या एका आठवड्यात इंडिया गेटवर काही खास कार्यक्रमांचं आयोजन करण्याच्या देखील तयारीत आहेत. पंतप्रधान मोदींनी रक्षा मंत्रालय आणि मनुष्यबळ विकासमंत्री आणि संस्कृतीक मंत्रालयाला देखील याबाबत सूचना दिल्या आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंडिया गेटवर सामान्य लोकांसाठी असलेल्या प्रर्दशनात स्वतंत्रता सेनानी आणि सेनेच्या वीरांचं बलिदान दाखवण्यात यावं. तात्या टोपे यांच्यापासून कारगिलमधील शहिदांचं बलिदान दाखवावं. देशभक्तीचे विविध कार्यक्रमांचं सामान्य लोकांसाठी आयोजन करावं असं देखील पंतप्रधानांनी सूचवलं आहे. 


राजपथवर दिसणार लढाऊ विमानं


पहिल्यांदाच लाल किल्ल्यावर पंतप्रधानांच्या ध्वजारोहणनंतर वायुसेनेचे हेलीकॉप्टर आणि लढाऊ विमानं राजपथावरुन उडतांना दिसणार आहे. सामान्य लोकांना चित्तथरारक कसरती पाहायला मिळणार आहेत.


सेनेच्या तिन्ही दलाचे बँडपथक करणार कार्यक्रम 


इंडिया गेट, कॅनॉट प्लेस आणि दिल्लीच्या वेगवेगळ्या मॉलमध्ये तिन्ही सेनेचे बँड कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. सांस्कृतीक कार्यक्रमासोबतच सेनेची माहिती देखील सामान्य लोकांना दिली जाणार आहे.