नवी दिल्ली : लुधियानामधील १५ वर्षीय जान्हवीने जेएनयू वाद प्रकरणातील आरोपी कन्हैयाला खुलं आव्हान दिलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कन्हैया कुमारने या वादप्रकरणात जे काही पंतप्रधान मोदींविरोधात म्हटलंय ते अस्वीकाहार्य असल्याचे जान्हवीचे म्हणणे आहे. 


याबाबतचा व्हिडीओ प्रसिद्ध करण्यात आलाय. यात आपण कन्हैयासोबत कुठेही आणि कधीही बोलण्यास तयार असल्याचे तिचे म्हणणे आहे. याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका पत्रामध्ये जान्हवीने स्वच्छ भारत अभियानात दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल तिचे कौतुक केले होते.