नवी दिल्ली : मागील चार दिवसांमध्ये १२ जागांहून २१ कोटी रुपये जप्त झाले आहेत. चेन्नईमधील मायनिंग कॉन्ट्रॅक्टर शेखर रेड्डी यांच्याकडून १६६ कोटी आणि १२७ किलो सोनं मिळालं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कर्नाटकमध्ये चित्रदुर्ग येथील व्यापारी यांच्या गुप्त बाथरूममध्ये ५ कोटी ७० लाख रुपये मिळाले आहे. दिल्लीच्या ग्रेटर कैलाश यांच्या लॉ फर्ममध्ये १३ कोटी ६५ लाख रुपये मिळाले आहेत. मागील ४ दिवसात हैदराबादमधून ७१ लाख, मुंबईच्या माटुंगामधून ८५ लाख, गुजरातमध्ये २१ लाख, सूरतमध्ये 2 लाख, मध्य प्रदेशच्या होशंगाबादमधून ४३ लाख, जबलपूरमधून १९ लाख, मध्यप्रदेशच्या इंदौरमधून ८ लाख, राजस्थानच्या भीलवाडामध्ये सवा सात लाख आणि दिल्लीच्या गुडगावमधून १० लाख रुपये पकडले गेले आहे.


वेगवेगळ्या छाप्यांमध्ये १ लाख २ हजारच्या नोटा सापडल्या आहेत. नोटबंदीनंतर ६ डिसेंबरपर्यंत ४०० तक्रारींमध्य़े १३० कोटींच्या नोटा मिळाल्या आहेत. जवळपास १५० कोटी रुपयांची संपत्ती सरकारकडे जमा झाली आहे.