नवी दिल्ली : सरकारी विभागामध्ये कर्मचाऱ्यांची कमी दूर करण्यासाठी केंद्र सरकार लवकरच भर्ती करणार आहे. केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या विभागांमध्ये जवळपास २ लाख ८० हजार जागांसाठी भर्ती करणार आहे. भर्ती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मार्च २०१८ ची डेडलाईन आहे. त्यामुळे २०१६ मध्ये जी संख्या 32.84 लाख होती ती २०१८ तक 35.67 लाख होणार आहे. यामुळे २ लाख ८० हजार जागा अधिक भरल्या जाणार आहे.


काळ्या पैशावर लगाम लावण्यात महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या आयकर विभागातही कर्मचाऱ्यांची संख्या ४६ हजारावरुन ८० हजार करण्यात येणार आहे. तसेच कस्टम आणि एक्साइज डिपार्टमेंटमध्ये ही भर्ती केली जाणार आहे. यामध्ये ४१ हजार कर्मचाऱ्यांची भर्ती केली जाणार आहे. सध्या जवळपास ५०,६०० कर्मचारी आहेत पण २०१८ पर्यंत ही संख्या ९१,७०० केली जाणार आहे.