...म्हणून या तरुणाने मोदींचा अॅप हॅक केला
नोटबंदीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशामध्ये कॅशलेस अर्थव्यवस्था उभी करु इच्छित आहेत. पण २२ वर्षाच्या एका युवकाने त्यांचा अॅप हॅक केला आहे. हॅक करणं इतकं सोपं नाही आहे पण या युवकाला पंतप्रधानांच्या या अॅपमध्ये काही दोष होते ते दाखवून द्यायचे होते म्हणून त्याने त्यांचं अॅप हॅक केलं.
मुंबई : नोटबंदीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशामध्ये कॅशलेस अर्थव्यवस्था उभी करु इच्छित आहेत. पण २२ वर्षाच्या एका युवकाने त्यांचा अॅप हॅक केला आहे. हॅक करणं इतकं सोपं नाही आहे पण या युवकाला पंतप्रधानांच्या या अॅपमध्ये काही दोष होते ते दाखवून द्यायचे होते म्हणून त्याने त्यांचं अॅप हॅक केलं.
मुंबईच्या सॉफ्टवेअर कंपनीमध्ये काम करणाऱ्या जावेद खत्री याच्या मते गुरुवारी रात्री त्याने पंतप्रधान मोदींचं अॅप हॅक केलं. या दरम्यान तो यूजर्सच्या खाजगी माहितीपर्यंत पोहचू शकला असता. पण त्याने तसं नाही केलं. खाजगी माहितीमध्ये ईमेल आयडी आणि केंद्रिय मंत्र्यांचे नंबर देखील मिळवता आले असते. जावेद म्हणतो की त्याचा उद्देश ७० लाख यूजर्सचा डेटा संबंधित असलेला धोका निदर्शनास आणून देण्याचा होता.
अॅप हॅकची माहिती पुढे आल्यानंतर भाजपच्या इन्फॉर्मेशन अँड टेक्नोलॉजीच्या राष्ट्रीय प्रमुख अमित मालवीय यांनी एका वेबसाइटला दिलेल्या माहितीमध्ये सांगितलं की, या अॅपमध्ये कोणतीही वैयक्तीक माहिती नाही आहे. अॅप यूजरची माहिती ऐनक्रिप्टेड मोडवर आहे. जावेद खत्रीला धन्यवाद देता की त्याने अॅपच्या सुरक्षिततेवर ध्यान दिलं. याची सुरक्षितता वाढवण्यासाठी आम्ही अधिक गोष्टींवर ध्यान देणार आहोत.