मुंबई हल्ल्याबाबत पाकिस्तानच्या माजी सुरक्षा सल्लागारांचा मोठा खुलासा
२६/११ मुंबई हल्ल्यावर पाकिस्तानचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार महमूद अली दुर्रानीने मोठा खुलासा केला आहे. सोमवारी १९ व्या एशियन सिक्युरिटी कॉन्फ्रेंसमध्ये बोलतांना त्यांनी म्हटलं की, `मुंबई हल्ला पाकिस्तानच्या एका दहशतवादी संघटनेने घडवून आणला होता. हा हल्ला ट्रांस-बॉर्डर टेररिस्ट इवेंटचं उदाहरण आहे. `दुर्रानींनी म्हटलं की, हाफिज सईद आमच्या कोणत्याही कामाचा नाही. आम्हाला त्याच्या विरोधात कारवाई करावी लागेल.`
नवी दिल्ली : २६/११ मुंबई हल्ल्यावर पाकिस्तानचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार महमूद अली दुर्रानीने मोठा खुलासा केला आहे. सोमवारी १९ व्या एशियन सिक्युरिटी कॉन्फ्रेंसमध्ये बोलतांना त्यांनी म्हटलं की, 'मुंबई हल्ला पाकिस्तानच्या एका दहशतवादी संघटनेने घडवून आणला होता. हा हल्ला ट्रांस-बॉर्डर टेररिस्ट इवेंटचं उदाहरण आहे. 'दुर्रानींनी म्हटलं की, हाफिज सईद आमच्या कोणत्याही कामाचा नाही. आम्हाला त्याच्या विरोधात कारवाई करावी लागेल.'
या कॉन्फ्रेंसमध्ये संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी देखील भाग घेतला. या दरम्यान त्यांनी दहशतवाद हे निश्चितच आंतरराष्ट्रीय शांती आणि सुरक्षेसाठी मोठा धोका असल्याचं म्हटलं आहे. जगातील सर्व देशांनी याला एकत्र उत्तर देण्याची गरज आहे. अफगानिस्तान आणि भारत अनेक दिवसांपासून प्रॉक्सी वॉर झेलत आहेत.'
पाकिस्तान याआधी मुंबई हल्ल्यात पाकिस्तानच्या कोणत्याही दहशतवाद्याचा हात नसल्याचं म्हटलं होतं. भारताने लष्कर चीफ हाफिज सईद विरोधात हल्ल्याशी संबंधित पुरावे देखील पाकिस्तानला दिले पण पाकिस्तानने तरी देखील हे मान्य केले नाही.
२६ नोव्हेंबर २००८ ला पाकिस्तानमधून समुद्रीमार्गे ९ दहशतवादी मुंबईत घुसले. एकूण ६० तास सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक चालली. या हल्ल्यात एकूण १६६ लोकांचा मृत्यू झाला होता. ताज हॉटेल, सीएसटी रेल्वे स्टेशन, नरीमन हाउस, कामा हॉस्पिटल या सारख्या ठिकाणी दहशतवद्यांनी हल्ले केले होते. यामध्ये एका दहशतवाद्याला जीवंत पकडण्यात आलं होतं. कसाबला मग नंतर फाशी देण्यात आली होती.