रेल्वेच्या वेटिंग तिकिटावर दुसऱ्या दिवशी प्रवास करु शकाल!
आता वेटिंग तिकिटावर दुसऱ्या दिवशी तुम्हाला प्रवास करणे शक्य होणार आहे.
नवी दिल्ली : रेल्वे प्रवास करणाऱ्यांसाठी एका चांगली बातमी आहे. तीही वेटिंग तिकिट असेल तर नो टेन्शन. कारण आता वेटिंग तिकिटावर दुसऱ्या दिवशी तुम्हाला प्रवास करणे शक्य होणार आहे. याबाबत रेल्वे नवी योजना लागू करण्याची शक्यता आहे. त्यावळ अधिकारी वर्ग काम करीत आहेत.
तुम्ही रेल्वेचे वेटिंग तिकिट काढलं आणि तुम्हाला त्याच दिवशी प्रवास करणे शक्य झाले नाही तर तुम्ही त्याच तिकिटावर दुसऱ्या दिवशी प्रवास करु शकता. त्यासाठी तुम्हाला दुसरे तिकिट काढण्याची गरज नाही. मात्र, त्यासाठी तुम्हाला तिकिट खिडकीवर जाऊन तशी विनंती करावी लागेल.
ही नवी योजना सुरु झाल्यानंतर प्रथम तुम्हाला काही गाड्यांमध्येच ही सुविधा मिळणार आहे. सुरुवातीला राजधानी, दुरन्तो, संपर्क क्रान्ती एक्सप्रेस याच गाड्यातून ही सुविधा मिळणार आहे. ही योजना यशस्वी झाल्यानंतर अन्य दुसऱ्या गाड्यांसाठी सुविधा लागू होणार आहे.
काय करावे लागणार?
रेल्वे प्रवाशाला एक विनंती करावी लागणार आहे. रेल्वेने या योजनेला अल्टरनेट ट्रेन अकोमोडेशन नाव दिलेय. प्रवाशाल आपल्या तिकिटासाठी त्या स्टेशनवरुन दुसऱ्या रेल्वेसाठी कन्वर्ट करण्याची विनंती करावी लागेल. याशिवाय प्रवाशाला आणखी दुसऱ्या स्पेशल ट्रेनसाठी रिक्वेस्टच्या आधारावर तिकिट दिले जाईल, अशी रेल्वेची योजना आहे.