चेन्नई : तमिळनाडूची राजधानी चेन्नईमध्ये एका सिनेमागृहात राष्ट्रगीता दरम्यान 2 महिलांसह 3 जणांना अटक केली आहे. प्लाजा सिनेमागृहात आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलमध्ये ही घटना घडली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे की, एका सिनेमाच्या स्क्रीनिंगदरम्यान राष्ट्रगीताला उभे न राहिल्याने स्क्रीनिंगच्या आयोजकांनी आणि काही लोकांनी यावर नाराजी दर्शवली आणि त्यांना बाहेर जाण्यास सांगितलं. पण ते बाहेर नाही गेले आणि काही लोकांसोबत झटापट देखील झाली.


फिल्म फ़ेस्टिवलचे दिग्दर्शक ई थंगराज यांनी म्हटलं की, त्यांना कळालं की सिनेमागहात काही लोकांमध्ये वाद झाला. त्यानंतर 3 लोकांना अटक झाली.


30 नोव्हेंबर 2016 ला सुप्रीम कोर्टाने सिनेमागृहात राष्ट्रगीत अनिवार्य केलं होतं. चेन्नईमधली ही दुसरी घटना आहे. 11 डिसेंबरला ही घटना घडली होती. काही लोकांमध्ये तेव्हाही यावरुन वाद झाला होता.