वॉशिंग मशीनमध्ये बुडून जुळ्या भावांचा मृत्यू
दिल्लीच्या रोहिणी परिसरात एक हृदयद्रावक घटना घडलीये. वॉशिंग मशीनमध्ये बुडून तीन वर्षांच्या दोन चिमुकल्यांचा मृत्यू झालाय.
नवी दिल्ली : दिल्लीच्या रोहिणी परिसरात एक हृदयद्रावक घटना घडलीये. वॉशिंग मशीनमध्ये बुडून तीन वर्षांच्या दोन चिमुकल्यांचा मृत्यू झालाय.
मुलांची आई वॉशिंग पावडर आणण्यासाठी बाहेर गेली होती. त्यादरम्यान ही घटना घडलीये. जे कपडे धुण्यासाठी काढले होते त्यावर उभे राहुन मशीनमध्ये डोकावताना ही मुले वॉशिंग मशीनच्या टबमध्ये पडली. यावेळी टबमध्ये 15 लीटर पाणी होते.
दोघंही चिमुकले अर्धा तास त्या टबमध्ये होते. त्या चिमुकल्यांची आई जेव्हा घरी आली तेव्हा हे दोघंही तिला घरात दिसले नाही. म्हणून तिने पतीला फोन करुन घरी बोलावले.
ज्यावेळी तिचे पती घरी आले तेव्हा मशीनच्या टबमध्ये ही मुले आढळली. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल कऱण्यात आले. मात्र तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.