नवी दिल्ली : उरी हल्ल्यानंतर 10 दिवसानंतर भारतीय लष्कराने गुरुवारी मोठा खुलासा केला. पहिल्यांदा सीमेपलीकडे पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून भारतीय जवानांनी दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकव्याप्त काश्मीरमध्ये 2 किमी आतमध्ये जात दहशतवाद्यांचे 7 तळ उद्ध्वस्त केले. यादरम्यान, या कारवाईत किती दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले याचा आकडा लष्कराकडून देण्यात आलेला नाही. मात्र या कारवाईत एकूण 30 ते 35 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आल्याची सूत्रांकडू माहिती मिळतेय


45 वर्षांत भारताने सहाव्यांदा सीमेपार जात अशा प्रकारची साहसी कारवाई केलीये. काल आम्हाला पक्की माहिती मिळाली होती की काही दहशवादी घुसखोरी कऱण्याच्या तयारीत आहेत. जम्मू-काश्मीरमधील शहरांमध्ये दहशतवादी हल्ला कऱण्याच्या तयारीने घुसखोरी करत आहेत. या माहितीनंतर भारतीय जवानांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून ही कारवाई केली. मध्यरात्री साडेबारा ते 4.30च्या दरम्यान ही कारवाई करण्यात आली.