मुंबई : देशातल्या तब्ब्ल 32 लाख डेबिट कार्ड धारकांना आपली कार्ड बदलावी लगाण्याची शक्यता आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डेबिट कार्डाचा वापर करताना अनेक अडचणी येत असल्याचं लक्षात आल्यावर प्रथम देशातली सर्वात मोठी बँक असणाऱ्या स्टेट बँकेनं गेल्या आठवड्यात सहा लाख ग्राहकांना कार्ड बदलण्याची सूचना केलीय. 


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार डेबिट कार्डाद्वारे होणाऱ्या अवैध व्यवहारांचा फटका खाजगी बँकांनाही बसलाय. त्यात ICICI, HDFC, आणि AXIS बँकेचा समावेश आहे. 


एकूण 32 लाख ग्राहकांना गेल्या काही दिवसात डेबिट कार्ड किंवा आपला PIN नंबर बदलण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. अनेकांची डेबिट कार्ड ब्लॉकही करण्यात आली आहेत. 


साधारणतः पाच आठवड्यांपूर्वी डेबिट कार्डांवरून संशयास्पद व्यवहार होऊ लागले. या व्यवहारांचं केंद्र चीनमध्ये असल्याचं पुढे येतंय.