बुरहानपूर / इंदोर : मध्यप्रदेश-महाराष्ट्रच्या सीमेवर शुक्रवारी चालू असलेल्या पोलीस तपासणी दरम्यान एका कारमधून हजारच्या नोटांनी भरलेल्या तीन बॅगा जप्त करण्यात आल्यात. जवळपास 4 कोटींच्या या नोटा आहेत.

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संशयावरून चालेल्या कारच्या तपासणीमध्ये सापडलेल्या नोटा पाहून पोलीसदेखील हैराण झाले. ज्या व्यक्तीकडे नोटा सापडल्या तो आपण व्यावसायिक असल्याचं सांगतोय. 'आम्ही बुरहानपुर हकिमी दर्गा दर्शनासाठी आलो होतो, त्यानंतर महाराष्ट्रत शेगावला जाणार होतो, असं शब्बीरचं म्हणणं आहे. अधिक चौकशी सुरू आहे.  

कारमध्ये शब्बीर त्याची सून आणि मुलगी होती. सापडलेल्या नोटांच्या बॅगसह संबंधित व्यक्तींस आणि कारला शाहपूर पोलीस स्टेशनला आणलं गेलं. त्याच दरम्यान इन्कम टॅक्सचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. मध्यप्रदेशातील विधानसभेच्या आगामी निवडणुकमुळे सीमेवर कसून तपासणी सुरू आहे.