कानपूर : पुखरैया येथे पाटना-इंदूर एक्स्प्रेस ट्रेनला झालेल्या अपघातात १४ डब्बे घसरल्याने ६३ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर १५० हून अधिक जण जखमी झाले आहेत. या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दु:ख व्यक्त केलं आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. ट्रेन ही इंदूरहून पटनाला जात होती. ही दुर्घटना सकाळी ३.१० वाजता घडली. झांसी आणि कानपूर येथून वैद्यकीय पथक तेथे पोहोचले आहे. S1, S2 या दोन डब्यांचं अधिक नुकसान झालं आहे. या दुर्घटनेनंतर अनेक गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत.


#WATCH 14 coaches of Patna-Indore express train derailed near Pukharayan (Kanpur, UP), 30 dead. Relief and rescue ops underway pic.twitter.com/u3JjiocIj6