नवी दिल्ली : एलपीजी म्हणजेच घरगुती सिलेंडरचे पैसे ऑनलाईन भरल्यास ग्राहकांना पाच रुपयांची सूट देण्यात येणार आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी या डिस्काऊंटची घोषणा केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कॅशलेस व्यवहारांना चालना देण्यासाठी पेट्रोल आणि डिझेल भरताना डिजीटल पेमेंट करणाऱ्या ग्राहकांना 0.75 टक्के सूट देण्याचे आदेश सरकारनं पेट्रोलियम कंपन्यांना दिले होते, आणि आता एलपीजी सिलेंडरवरही ही सूट देण्यात येणार आहे. हा ऑनलाईन व्यवहार करताना ग्राहकांना डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा नेट बॅकिंगचा वापर करावा लागणार आहे.