५०० च्या नोटा धुतल्या गेल्या, बँकेनेही नाकारल्या
जर तुमच्याकडे ५०० च्या नव्या नोटा आहेत पण त्या जर चुकून भिजल्या तर मग त्याचा रंग निघून जाईल. असं जालंधरच्या एका व्यक्तीने म्हटलं आहे. त्याच्यासोबत असं घडलं आहे आणि या नोटा बँकेतही घेतल्या जात नाही आहेत.
जालंधर : जर तुमच्याकडे ५०० च्या नव्या नोटा आहेत पण त्या जर चुकून भिजल्या तर मग त्याचा रंग निघून जाईल. असं जालंधरच्या एका व्यक्तीने म्हटलं आहे. त्याच्यासोबत असं घडलं आहे आणि या नोटा बँकेतही घेतल्या जात नाही आहेत.
जालंधरमधील एका शाळेतील शिक्षक सत्यदेव शर्मा यांनी म्हटलं की, त्यांच्या खिशातले ५०० च्या ६ नोटा चुकून ओल्या झाल्या. त्या वॉशिंग मशीनमध्ये धुतल्या गेल्या त्यामुळे त्याचा रंग निघून गेला.
बँकेत गेल्यानंतर त्यांना त्या बदलून नाही मिळाल्या. या नोटा बदलून देण्याबाबत आरबीआयकडून कोणतीही गाईडलाईन नसल्याचं त्यांना सांगण्यात आलं.