भारतातल्या या 7 गोष्टी ऐकून तुम्ही पण व्हाल हैराण
विविधतेनं नटलेल्या आपल्या भारत देशामध्ये प्रत्येक राज्याची संस्कृती वेगळी आहे
मुंबई: विविधतेनं नटलेल्या आपल्या भारत देशामध्ये प्रत्येक राज्याची संस्कृती वेगळी आहे. भारतातल्या अशा अनेक वेगवेगळ्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही कदाचित आजपर्यंत ऐकल्याही नसतील, अशाच भारतातल्या आगळ्यावेगळ्या गोष्टींवर एक नजर टाकुयात.
भारताचा कोणातही राष्ट्रीय खेळ नाही
हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ असल्याचं नेहमी बोललं जातं, पण भारताचा कोणताच राष्ट्रीय खेळ नाही. भारतानं जेव्हा ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण कामगिरी केली तेव्हा हॉकी भारतात लोकप्रिय झाली. पण हॉकीला राष्ट्रीय खेळाची अजून मान्यता मिळाली नाही.
तिरंग्याशिवाय फक्त काश्मीरचा आहे वेगळा झेंडा
भारत एक गणतांत्रिक देश आहे, देश हा शासन आणि संविधानावर चालतो. देशामध्ये एकूण 29 राज्य आणि 8 केंद्र शासित प्रदेश आहेत. पण जम्मू काश्मीर हे देशातलं एकमेव राज्य आहे, ज्याचा स्वत:चा वेगळा झेंडा आहे.
नोटा देशाबाहेर घेऊन जाणं बेकायदेशीर
जर तुम्ही एनआरआय किंवा विदेशी नागरिक असाल तर देशाबाहेर नोटा घेऊन जाणं बेकायदेशीर आहे.
कुंभमेळ्याचं वर्ल्ड रेकॉर्ड
भारत जगातला एकच असा देश आहे, जिकडे एकाच वेळी सगळ्यात जास्त लोक एकत्र आली. 10 फेब्रुवारी 2013 साली मौनी अमावस्येवेळी झालेल्या कुंभला 3 कोटी नागरिकांनी हजेरी लावली. अलाहाबादच्या घाटावर हा विश्वविक्रम नोंदवला गेला.
गायीसाठी लागतं आयकार्ड
पश्चिम बंगाल भारतातलं असं एकमेव राज्य आहे, जिथे गायीचं आयकार्ड असणं अनिवार्य आहे. पश्चिम बंगालमध्ये ज्यांच्याकडे गाय आहे, त्यांना तिचे फोटो काढून आयकार्ड बनवावं लागतं.
50% विस्की भारतात संपते
जगभरामध्ये जेवढी विस्की तयार केली जाते, त्याच्या 50% विस्की ही भारतात संपते. भारत दारु निर्मितीमध्ये जगातला दुसरा देश आहे.
हिंदी राष्ट्रभाषा नाही
हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा असल्याचा अनेकांचा गैरसमज आहे. पण हिंदी राष्ट्रभाषा असल्याची सरकार दफ्तरी अशी कोणतीही नोंद नाही.