अमृतसर : पंजाबमधील अमृतसर इथं लग्नाच्या ४६ वर्षानंतर ७२ वर्षीय एका महिलेनं एका गोंडस मुलाल जन्म दिलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दलजिंदर कौर असं या महिलेचं नाव आहे. हरियाणाच्या हिसारमध्ये 'आयव्हीएफ' टेस्ट ट्यूब तंत्राच्या साहाय्यानं दलजिंदर यांना अपत्यप्राप्ती झालीय. 


दलजिंदर कौर यांना ७२ व्या वर्षी आई होण्याचं सुख मिळालंय. त्यांनी या मुलाचं नाव अरमान ठेवलंय आहे. दलजिंदर कौर यांचे पती मोहिंदर सिंह गिल यांचं वय ७९ असून दलजिंदर कौर या गेल्या तीन वर्षांपासून 'इन विट्रो फर्टिलाइजेशन'ची (आयव्हीएफ) ट्रीटमेंट घेत होत्या.