मुंबई : काळ्यापैशांवर मोदी सरकारने ऑपरेशन करत अनेक ठिकाणी ईडीने छापे टाकले. देशभरात १६ राज्यांमध्ये छापे टाकण्यात येत आहेत. शेकडो ईडीचे अधिकारी काळ्यापैशांवर धडक कारवाई करत आहे.

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ईडीच्या टीमला मुंबईमध्ये जगदीश पुरोहित नावाच्या व्यक्तीच्या पत्त्यावर ७०० बनावट कंपन्यांचा पत्ता असल्याच समोर आलं आहे. ईडीने आज सकाळपासून १६ राज्यांमध्ये नोंदणी असलेल्या फर्जी कंपन्यांवर धडक कारवाई सुरु केली आहे.

दिल्ली, मुंबई, कोलकाता ,चंडीगढ, पटना, ओडिशा, बंगळुरु, चेन्नई, कोच्ची आणि हैदराबाद यासारख्या मोठ्या शहरांमध्ये ईडीची टीम एक साथ कारवाई करत आहे. काल देशाबाहेर राहणाऱ्या लोकांना जुन्या नोटा बदलण्याचा शेवटचा दिवस होता. त्यानंतर आज ईडीने आज ही धडक कारवाई सुरु केली आहे.