लखनऊ : उत्तर प्रदेशमधील इटाह जिल्ह्यात शाळेच्या बसला झालेल्या भीषण अपघातात तब्बल २४ विद्यार्थी ठार झालेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अलिगंजमध्ये शाळेच्या बसची धडक वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रकला बसली. ही धडक इतकी भीषण होती की या धडकेत २४ विद्यार्थी ठार झालेत. तर ४० विद्यार्थी जखमी झालेत. 


गंभीर विद्यार्थ्यांमध्ये अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेय. धुक्यामुळे हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय. या अपघातात ट्रकचा चालकही गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे.