भोपाळ : भोपाळच्या सेंट्रल जेलमधून फरार झालेले सिमीचे आठही दहशतवादी चकमकीत मारले गेलेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भोपाळजवळील इंटखेडी येथे झालेल्या चकमकीत हे दहशतवादी ठार झालेत. रविवारी रात्री दोन ते तीनच्या सुमारास हे दहशतवादी तुरुंगातून पळून गेले होते. 


जेल गार्डची हत्या केल्यानंतर चादरीच्या सहाय्याने भिंत चढून हे सर्व दहशतवादी पळून गेले होते. त्यानंतर तातडीने या सर्व दहशतवाद्यांचा तपास सुरु करण्यात आला होता. 


पुण्यातील फरासखाना स्फोटातील हो आरोपी होते. 2014मध्ये पुण्यात फरासखाना येथे स्फोट झाला होता. या स्फोटात या दहशतवाद्यांचा सहभाग होता.