मुंबई : कर्मचारी भविष्य निधी संघटना अर्थात ईपीएफओनं आपल्या 50 लाख पेन्शनधारकांना आणि जवळपास चार करोड भागधारांना आधार कार्ड सादर करणं अनिवार्य केलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या महिन्याच्या शेवटपर्यंत अर्थात 31 जानेवारी 2017 पर्यंत ईपीएफओच्या सर्व भागधारकांना आधार कार्ड सादर करावं लागणार आहे. ज्या भागधारकांकडे आणि पेन्शनधारकांकडे आधार कार्ड नाही त्यांनी आधार कार्ड काढण्यासाठी केलेल्या अर्जाची माहिती द्यायची आहे. 


कर्मचारी पेन्शन योजना (ईपीएस) 1995 अंतर्गात लाभ प्राप्त करण्यासाठी पेन्शन आणि सद्य सदस्यांसाठी आधार कार्ड सादर करणं अनिवार्य करण्यात आलंय. 


प्रत्येक महिन्याला केंद्र सरकार सर्व सदस्यांच्या पेन्शन खात्यात 1.16 टक्के योगदान देतं. तर 8.33 टक्के योगदान सदस्यांना करावं लागतं.