मुंबई : तुमच्याकडे जर आधार कार्ड नसेल तर लवकरच बनवून घ्या... कारण केंद्र सरकारनं यासंबंधी एक मोठा निर्णय नुकताच जाहीर केलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सरकारनं एक नोटिफिकेशन जाहीर करून 30 जून 2017 पर्यंत आधार कार्ड बनवून घेण्याचे आदेश दिलेत. आधार कार्ड नसेल तर तुम्हाला अनेक समस्यांना तोंड द्यावं लागू शकतं. 


कारण, अनेक गोष्टींसाठी आधार कार्ड गरजेचं असल्याचं सरकारकडून सांगण्यात येतंय. शिवाय, बँक खात्यांत आणि गॅस कनेक्शनशी आधार कार्ड लिंक करण्याचेही आदेश देण्यात आलेत.


यासाठी आधार कार्ड गरजेचं...


- सरकारी कामकाजासाठी आधार कार्ड महत्त्वाचं आहे


- रेशनिंग दुकानात खरेदीवर सबसिडी मिळवण्यासाठी


- एलपीजी गॅस सबसिडीसाठी


- बोर्डाच्या परिक्षेला बसण्यासाठीही आधार गरजेचं आहे


- जेईई मेन्स फॉर्म भरण्यासाठी अनिवार्य (यंदा, ऑनलाईन अर्ज भरताना आधार नंबर देणं गरजेचं आहे... केवळ जम्मू काश्मीर, आसाम आणि मेघालयच्या अर्जदारांसाठी आधारकार्ड अनिवार्य नसेल)