नवी दिल्ली : यापुढे तुमचा मोबाईल नंबर आणि आधार नंबरशी जोडणं बंधनकारक होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सर्वोच्च न्यायालयानं सर्व मोबाईल कंपन्यांना वर्षभराच्या काळात सर्व ग्राहकांचे मोबाईल नंबर आधार कार्डाशी जोडण्याचे निर्देश दिले आहेत.


मोबाईल वापरणाऱ्यांची ओळख निश्चित करण्यासाठी आधार नंबर अत्यंत महत्वाचं साधन ठरणार असल्याचं अॅटर्नी जनरल मुकूल रोहतगी यांनी कोर्टाला सांगितलंय.


त्यामुळे सरकार स्वतःहून मोबाईल कंपन्याना आधार नंबरशी जोडण्याचा आग्रह धरत असल्याचंही रोहतगींनी कोर्टात म्हटलंय.


रिचार्ज करताना ओळखपत्राची गरज?


दरम्यान, प्रीपेड ग्राहकांनी प्रत्येक रिचार्जच्या वेळी आपलं ओळखपत्र दाखवावं असंही कोर्टानं म्हटलंय. पण ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात प्रीपेड सुविधा वापरली जाते. त्यामुळे प्रत्येक वेळी ओळखपत्र दाखवण्याच्या सूचनेची अंमलबजाणी कठीण असल्याचं रोहतगी यांनी स्पष्ट केलंय.