दिल्ली विद्यापिठात `अभाविप`चं वर्चस्व...
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटानेच्या निवडणुकीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं आपलं वर्चस्व राखलंय.
दिल्ली : दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटानेच्या निवडणुकीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं आपलं वर्चस्व राखलंय.
दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सचिवपदी अभाविपचे उमेदवार निवडून आलेत तर सहसचिवपदी 'नॅशनल स्टुडंट युनियन ऑफ इंडिया' अर्थात 'एनएसयूआय'च्या उमेदवारांना संधी मिळालीय.
अभाविपनं या निवडणुकीत चारपैंकी तीन जागा पटकावल्यात. अध्यक्षपदी अमित तन्वर, उपाध्यक्षपदी प्रियंका छाब्रि, सचिवपदी अंकित सांगवान निवडून आलेत. तर सहसचिवपदी एनएसयुआयचा मोहित सांगवान विजयी झालाय. यंदा झालेल्या विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीत अभाविप, एनएसयूआय आणि डाव्या पक्षांची आयसा यांच्यात तिरंगी लढत झाली.
पुढच्याच वर्षी दिल्लीतल्या तीन महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत. त्यामुळे या निवडणुकीला विशेष महत्व आले होते. विद्यार्थी संघटनांच्या माध्यमातून राजकीय पक्षही या निवडणुकीत उतरले होते. दिल्ली विद्यापिठाच्या अंतर्गत येणाऱ्या ५० महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी यासाठी मतदान केलं.
जेएनयू विद्यार्थी संघटनेचा निकालही शनिवारी रात्री उशिरापर्यंत किंवा रविवारी सकाळपर्यंत लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता सर्वांच्या नजरा जेएनयूकडे आहेत.