नवी दिल्ली : भोजपुरी अभिनेता रवी किशन यांनी आज भाजपा अध्यक्ष अमित शाह यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला आहे. आपण मोदी यांचे काम पाहिलं असून त्याच्या कामाने आपण प्रभावित होऊन भाजपमध्ये प्रवेश करीत आहोत अशी प्रतिक्रिया दिलीय. यावेळी दिल्ली भाजपचे अध्यक्ष आणि अभिनेते मनोज तिवारी देखील उपस्थित होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2014च्या निवडणुकीमध्ये रवी किशन यांनी काँग्रेसच्या तिकीटावर लोकसभा निवडणूक लढली होती. जौनपूर मतदार संघातून रवी किशन निवडणुकीच्या रिंगणात होते, पण त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.