रायबरेली : अमेरिकेतली तगड्या पगाराची नोकरी सोडून निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या आदिती अखिलेश सिंह राय यांचा विजय झाला आहे. आदिती या रायबरेली सदर या मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवत होत्या. आदितीनं बसपाच्या मोहम्मद शाहबाज खान यांचा ९० हजार मतांनी पराभव केला. आदितीला १ लाख २८ हजार तर मोहम्मद शाहबाज खान यांना ३९ हजार मतं मिळाली. आदिती ही अखिलेश सिंह राय यांची मुलगी आहे. अखिलेश १९९३पासून रायबरेलीमधूनच पाच वेळा आमदार राहिले होते.


कोण आहे आदिती अखिलेश सिंह राय?


आदितीनं ड्यूक यूनिव्हर्सिटीमधून मॅनेजमेंटची डिग्री मिळवली आहे. निवडणुकीवेळी दिलेल्या शपथपत्रानुसार आदितीकडे १४ लाख रुपयांची मालमत्ता तर ४५ लाख रुपयांचं कर्ज आहे. ट्रान्सपोर्ट कंपनीसाठी आदितीनं हे कर्ज घेतलं आहे.