मी राहुल आणि अखिलेश जोडीच्या मध्येच आलो - आदित्यनाथ
उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मंगळवारी 16 व्या लोकसभेतलं शेवटचं भाषण केलं.
नवी दिल्ली : उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मंगळवारी 16 व्या लोकसभेतलं शेवटचं भाषण केलं.
गेल्या 15 वर्षांपासून गोरखपूरमध्ये एकही दंगा झालेला नाही... उत्तरप्रदेशात कुठेही दंग्याची परिस्थिती उद्भवणार नाही, याकडे आपला कटाक्ष राहील, असं आश्वासन योगी आदित्यनाथ यांनी यावेळी दिलं. विधानसभा निवडणुकीत लोकांनी जात, धर्म आणि पंथाच्या पलिकडे जाऊन मतदान केल्याचं त्यांनी म्हटलंय.
लोकसभेत हास्यकल्लोळ
लोकसभेतलं वातावरण हलकं करत त्यांनी राहुल गांधी - अखिलेश यादव यांच्या जोडीवर मजेशीर पद्धतीनं निशाणाही साधला. 'मी राहुल गांधींहून एक वर्ष छोटा आहे... आणि अखिलेश यांच्यापासून एक वर्ष मोठा... मला वाटतं की मी राहुल - अखिलेश जोडीच्या मध्येच आलोय' असं त्यांनी म्हटलं आणि लोकसभेत हास्यकल्लोळ उठला.
उत्तरप्रदेशात माता - भगिनींना सुरक्षेसाठी आता कुणाकडेही भीक मागावी लागणार नाही... गोरखपूरमध्ये व्यापारीही सुरक्षित व्यापार करत आलेत... माझ्या खासदार क्षेत्रात खंडणीची पद्धतही बंद झालीय, असंही त्यांनी लोकसभेत म्हटलंय.