नवी दिल्ली : योग गुरू बाबा रामदेव यांच्या पतंजली कंपनीला मोठा झटका लागला आहे. मेरठ मध्ये फूड सेफ्टी अँड अॅडमिनिस्ट्रेशनने पतंजली आटा नूडल्स हे खाण्या योग्य नसल्याचं सांगितलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फूड सेफ्टी अँड अॅडमिनिस्ट्रेशनच्या टीमने निरीक्षणात असं आढळून आलं की या मॅगीमध्ये ३ टक्के नको असलेल्या गोष्टी अधिक आहे. जे मॅगीमध्ये असलेल्या कंटेन्ट पेक्षा अधिक आहे. मॅगी, पतंजली नूडल्स आणि येप्पी या सगळ्याचं सॅम्पल तपासण्यात आले. 


सगळ्यांमध्येच आरोग्यासाठी हानिकारक असलेले पदार्थ अधिक आढळले. ज्या गोष्टी १ टक्का हवे त्या गोष्टी ३ टक्के आढळून आल्याने आता यावर आणखी काय कारवाई होते हे पहावं लागेल.