ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळा, संरक्षणमंत्री राज्यसभेत सादर करणार सर्व कागदपत्र
ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदीतल्या लाचखोरी संदर्भातली सर्व कागदपत्र आज संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर राज्यसभेत मांडणार आहे. दुपारी दोन वाजता या विषयावर अल्पकालीन चर्चा होणार आहे. त्याच्या सुरुवातीलाच पर्रिकर भाषण करणार आहेत.
नवी दिल्ली : ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदीतल्या लाचखोरी संदर्भातली सर्व कागदपत्र आज संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर राज्यसभेत मांडणार आहे. दुपारी दोन वाजता या विषयावर अल्पकालीन चर्चा होणार आहे. त्याच्या सुरुवातीलाच पर्रिकर भाषण करणार आहेत.
हेलिकॉप्टर खरेदीच्या करारात लाचखोरी झाल्याचं उघड झालयं. याप्रकरणी इटलीतल्या मिलान अपील कोर्टानं तिघांना दोषी ठरवून शिक्षा सुनावलीय. पण या तिघांनी भारतात नेमकी कुणाला लाच दिली हे अजून सिद्ध झालेलं नाही. सुब्रह्मण्यम स्वामी यांनी याप्रकरणी हस्ते परहस्ते काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी लाच घेतल्याचा आरोप केलाय.
दरम्यान आज माजी एअर चीफ मार्शल एस पी त्यागी यांची चौकशी पुन्हा सुरूच राहणार आहे. एस पी त्यागी यांनी फिनमिकानिका या हेलिकॉप्टर खरेदीसंदर्भात इटली जाऊन अधिकाऱ्यांची भेट घेतल्याचं कबुल केलंय. त्यामुळे लाचखोरीचा संशय आणखी गडद होत चाललाय. सरकारतर्फे सुरू झालेल्या या कारवाईला कसं समोरं जायचं याची रणनीती ठरण्यासाठी आज काँग्रेसचीही बैठक होणार आहे.