चेन्नई : तामिळनाडूच्या मुख्यमंत्री आणि अण्णाद्रमुकच्या प्रमुख जयललिता यांच्यावर प्रकृती अस्वास्थ्यामुळे रूग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांच्या जागी प्रभारी मुख्यमंत्री नेमण्यास एआयडीएमके पक्षाने विरोध दर्शवला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२२ सप्टेंबरपासून जयललिता या रूग्णालयात उपचार घेत आहेत. या दरम्यान शुक्रवारी तमिळनाडूचे राज्यपाल विद्यासागर राव यांनी राज्याचे मुख्य सचिव पी. रामा मोहना राव यांच्यासोबत बैठक घेतली त्यानंतर राज्यपालांनी एआयडीएमकेचे मंत्री ओ. पन्नीरसेल्वम यांच्यासह अन्य काही मंत्र्यांशीही चर्चा केली.


एखाद्या मंत्र्याला उपमुख्यमंत्रीपद दिले जाण्याची शक्‍यता असल्याचे सूत्रांची माहिती आहे पण एआयडीएमके उपमुख्यमंत्रीपदी किंवा प्रभारी मुख्यमंत्री नेमण्याच्या विरोधात आहे. जयललितांकडे असलेल्या इतर विभागाच्या जबाबदाऱ्या इतर कोणाकडे तरी सोपविण्याबाबत पक्षामध्ये विचार सुरू आहे. जयललिता यांच्याकडे सार्वजनिक विभाग, आयएएस, आयएफएस, आयएफएस, सामान्य प्रशासन, जिल्हा महसूल, पोलीस, गृहमंत्रालय या विभागाच्या जबाबदाऱ्या आहेत.