हैदराबाद : एअर इंडियाचं ए३२० हे विमान रविवारी सकाळी बेगमपेठ विमानतळ परिसरात कोसळल्याने एक अपघात झाला. एका क्रेनच्या मार्फत हे विमान एअर इंडियाच्या प्रशिक्षण विभागात वाहून नेण्यात येत होतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शनिवारी रात्री हे विमान हलवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. मात्र रविवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास हे कोसळलं.



हे विमान सेवेतून निवृत्त झालेलं असल्याने त्याचा वापर विमान कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी करण्यात येणार होता. त्यासाठीच ते बेगमपेठ विमानतळापासून २-३ किलोमीटर दूर असणाऱ्या प्रशिक्षण केंद्रात नेण्यात येत होतं.


सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झालेलं नाही. विमानतळ परिसरात राहणाऱ्या व्यक्तींच्या खाजगी मालमत्तेचं मात्र थोडं नुकसान झालं आहे.