Jio इफेक्ट : एअरसेलने केले अनलिमिटेड कॉलिंग फिचर, १४ रुपयांनी सुरू
एअरटेल, व्होडाफोन आणि आयडीयानंतर आता एअरसेलने पण अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग पॅक आपल्या प्रीपेड ग्राहकांसाठी बाजारात आणले आहे.
नवी दिल्ली : एअरटेल, व्होडाफोन आणि आयडीयानंतर आता एअरसेलने पण अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग पॅक आपल्या प्रीपेड ग्राहकांसाठी बाजारात आणले आहे.
कंपनीने दोन पॅक RC14 आणि RC249 बाजारात आणले आहेत. या माध्यमातून युजर्स एअरसेल आणि सर्व नेटवर्कवर फ्री अनलिमिटेड बोलू शकणार आहे. याची व्हॅलिडीटी २८ दिवस असणार आहे.
या शिवाय ४ जी हँडसेडच्या ग्राहकांना आसाम, तसेच ईशान्यकडील राज्य आणि बंगाल, कोलकता, उत्तर प्रदेश पूर्व, बिहार आणि झारखंड, कर्नाटक आणि आंध्रप्रदेशातील सर्कलमध्ये या खेरीज अतिरिक्त १.५ जीबी ३ जी डाटा मिळणार आहे.
RC249 मध्ये ग्राहकांना २४९ रुपयांचा प्लॅन घ्याव लागणार त्यात त्यांना कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉल आणि २ जी डेटाचा लाभ घेऊ शकता. याची व्हॅलिडीटी २८ दिवसांची असणार आहे. तर RC14 या प्लॅनची व्हॅलिडीटी एका दिवसाची असणार आहे.