लखनौ : उत्तर प्रदेशातली निवडणूक जशी-जशी जवळ येतेय तसं उत्तर प्रदेशात वातावरण तापत चाललंय. पक्षाचं चिन्ह जिंकल्यानंतर अखिलेश यादव यांनी पिता मुलायमसिंह आणि माझात कोणताही वाद नसल्याचं म्हटलं आहे. आमचे नातं अतूट असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. विधानसभा निवडणुकीत त्यांना सोबत घेऊ असं देखील त्यांनी म्हटलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सर्वांना सोबत घेऊन राज्यात पुन्हा समाजवादी पक्षाचे सरकार आणण्यासाठी प्राधान्य असणार आहे. सायकलचे चिन्ह आपल्यालाच मिळणार अशी खात्री होती. आता निवडणुकीसाठी कमी कालावधी उरला आहे. उमेदवारांची यादीही निश्‍चित करायची आहे. आपल्यावर ही सर्वांत मोठी जबाबदारी असून त्यासाठी सर्वांना सोबत घेऊन वाटचाल करणार असल्याचं अखिलेश कुमार यांनी म्हटलं आहे.


पिता-पुत्रामध्ये काही दिवसांपासून वाद सुरू आहे. अखिलेश यांनी पक्षाच्या चिन्हावर दावा केला आणि याचा निकाल त्यांच्या बाजूने लागला. पित्याला हरवण्याचा आनंद नाही पण ही लढाई आवश्‍यक होती असं देखील  अखिलेश यांनी म्हटलं आहे.