उत्तर प्रदेश : समाजवादी पक्षामध्ये सध्या बरेच वाद सुरु आहेत. अखिलेश यादव आणि जुन्या नेत्यांमध्ये काहीही अलबेल नसल्याचं दिसतंय. आता यातच एक मोठी बातमी अशी येते आहे की, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव स्वत:चा नवा पक्ष सुरु करण्याच्या विचारात आहे. अखिलेश यादव समाजवादी पक्षातून बाहेर पडतील अशी चर्चा सुरु झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टाइम्स ऑफ इंडियाच्या बातमीनुसार अखिलेशच्या समर्थक आणि पक्षाचे महासचिव राम गोपाल यादव हे नुकतेच दिल्लीत निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना भेटले. त्यामुळे ते वेगळा पक्ष सुरु करतील का यावर चर्चा सुरु झाल्या आहेत.


अखिलेश समर्थकांचा दावा


अखिलेश यादव यांच्या समर्थक म्हणतांयत की, हा शेवटचा आणि दु:खद निर्णय असेल पण आम्हाला विश्वास आहे की, अखिलेश यादव यांच्या चांगल्या कामाच्या बळावर आम्ही पुन्हा सत्ता मिळवू. आम्हाला समाजवादी विचारधारेच्या खरे उत्तराधिकारी म्हणून पाहिलं जाईल.


पक्षाचं नाव आणि चिन्ह 


अखिलेश यादव यांच्या नव्या पक्षाचं नाव आणि चिन्ह काय असेल यावर देखील चर्चा झाल्याचं समजतंय. प्रोग्रेसिव समाजवादी पक्ष असं पक्षाचं नाव असू शकतं आणि मोटरसायकल हे त्यांचं चिन्ह असू शकतं अशा चर्चा आहेत.