नवी दिल्ली : काश्मीर मुद्यावर सर्वपक्षीय मत विचारात घेतलं जाणार असल्याचं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. गेल्या दोन महिन्यांपासून काश्मीरमध्ये सुरु असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय शिष्टमंडळ रविवारी श्रीनगरला जाणार आहे. याच दौ-याआधी सर्वपक्षीय बैठक पार पडली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या बैठकीला काँग्रेस नेत्या अंबिका सोनी, गुलाम नबी आझाद, केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह, शरद यादव, असदुद्दीन ओवैसी, सीताराम येचुरी यांच्यासह विविध पक्षातील नेते सहभागी झाले होते. या बैठकीत विविध पक्षीय सदस्यांनी आपापली मतं मांडली.


शिष्टमंडळ काश्मीरहून परतल्यानंतर पुन्हा एकदा सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात येणार आहे. हुर्रियतलाही काश्मीरप्रश्नी चर्चेचं निमंत्रण पाठवावं अशी मागणी माकप नेते सीताराम येचुरी यांनी केली आहे. एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी येचुरी यांच्या मागणीचं समर्थन केलं आहे. तर काश्मीरप्रश्नी सर्वपक्षीय सदस्यांचं मत सरकारनं विचारात घ्यावं असं गुलाम नबी आझाद यांनी म्हटलं आहे.